तुमच्या गाडीवर ट्रॅफिक दंड किती रुपये आहे, पहा सोप्या पद्धतीने

तुम्ही दुचाकी किंवा चार चाकी गाडी चालवताना वाहतुकीचे नियम, कळत नकळत मोडलेले असतात, अशा वेळी तुमच्या गाडीवर ट्रॅफिक दंड लावण्यात येतो

गाडीवरील E-Challan फाइन ऑनलाईन कसा तपासावा आणि भरावा?

ट्रॅफिक ई-चलान महाराष्ट्र

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास ट्रॅफिक पोलिसांकडून ई-चलान जारी केले जाते. अनेक वाहनचालकांना हे चलान कसे तपासायचे आणि दंड ऑनलाईन कसा भरायचा याची माहिती नसते. त्यामुळे या लेखात आपण संपूर्ण प्रक्रिया सोप्या शब्दांत समजून घेणार आहोत.

ई-चलान म्हणजे काय?

ई-चलान म्हणजे इलेक्ट्रॉनिक चलान, जे वाहनाच्या नियमभंगानंतर ट्रॅफिक पोलिसांकडून ऑनलाईन पद्धतीने जारी केले जाते. यामध्ये उल्लंघनाची माहिती, दंडाची रक्कम आणि चलान भरायची अंतिम तारीख दिलेली असते.

तुमच्या वाहनावर ई-चलान आहे का हे कसे तपासावे?

१. महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: mahatrafficechallan.gov.in

२. “E-Challan Payment Maharashtra State” पेज उघडेल.

३. “Vehicle No.” पर्याय निवडा आणि तुमच्या गाडीचा नंबर टाका.

४. चेसिस किंवा इंजिन क्रमांकाच्या शेवटच्या चार आकड्या प्रविष्ट करा.

५. “I’m not a robot” हा व्हेरिफिकेशन कोड भरा आणि “Submit” बटण दाबा.

ई-चलान भरायची प्रक्रिया

१. तुमच्या गाडीवरील सर्व ट्रॅफिक चलानची यादी स्क्रीनवर दिसेल.

२. कोणत्या कारणास्तव दंड लावला गेला आहे हे तपासा.

३. जर तुम्हाला चुकीचे चलान वाटत असेल, तर “Grievance” पर्याय वापरून तक्रार करा.

४. योग्य असलेल्या चलानची रक्कम तपासा आणि त्याच्या शेजारी असलेल्या “Select” बॉक्सवर क्लिक करा. 5. “Click here to pay” बटण निवडा.

६. “Terms and Conditions” वाचून “Agree” वर क्लिक करा.

७. “Pay Now” बटणावर क्लिक करा.

८. पेमेंटसाठी उपलब्ध पर्यायांमधून (Credit/Debit Card, UPI, Net Banking) योग्य पर्याय निवडा.

९. पेमेंट यशस्वी झाल्यावर तुमच्या स्क्रीनवर Receipt दिसेल, ती डाउनलोड करून ठेवा.

१०. पुन्हा वेबसाईटला भेट देऊन “Payment Status” मध्ये Paid असा स्टेटस असल्याची खात्री करा.

जर चुकीचा ई-चलान मिळाला असेल तर काय करावे?

जर तुमच्या नावाने जारी झालेले ई-चलान चुकीचे असेल, तर तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता. १. ट्रॅफिक पोलिसांच्या वेबसाईटवर जा. २. “Grievance” पर्याय निवडा. ३. तुमचे चलान क्रमांक आणि समस्या नमूद करा. ४. पुरावा (फोटो, व्हिडिओ) असल्यास अपलोड करा. ५. सबमिट केल्यानंतर तुमच्या तक्रारीवर कारवाई होईल.

निष्कर्ष

ट्रॅफिक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर तुमच्या गाडीवर ई-चलान असेल, तर दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून ऑनलाईन तपासणी आणि पेमेंट करणे सहज शक्य आहे. माहिती उपयोगी वाटली असेल, तर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *